भारतात पैसे पाठवणे ही प्रक्रिया रिझर्व्ह बँक
ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठविन्याच्या
विविध प्रक्रिया अस्तित्वात आहेत. त्यात NEFT, RTGS आणि
IMPS या प्रक्रियांचा समावेश होतो. बँकेत
किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही NEFT, RTGS आणि IMPS बद्दल ऐकलं असेल. पण कधी तुम्ही विचार
केला आहे का कि NEFT,
RTGS आणि IMPS म्हणजे नेमकं काय आहे? त्यांच्यामधील फरक काय आहे ? चला तर आज जाणून घेऊया...
इंटरनेटमुळे ऑनलाईन बँक व्यवहार करणं शक्य झालं आणि त्यामुळे पैशाची देवाणघेवाण अनेक अर्थाने सोपी झाली.
संगणक किंवा
मोबाईलचं एक बटण दाबलं की पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठविण्याची सोय
झाली. त्यासाठी तुम्हाला ना बँकेत जावं लागतं, ना चेक लिहून द्यावा लागतो.
पैसे दुसऱ्याच्या
खात्यात जमा झाले आहेत की नाही,
हे ही लगेच ऑनलाईन समजतं. ग्राहक
एखादी व्यक्ती असो, उद्योजक किंवा संस्था. दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेल्या
व्यक्तीही कमीत कमी वेळात पैशाची देवाणघेवाण करू शकतात. काही विशिष्ट सेवांसाठी तर
बँकेत खातं असण्याचीही गरज नाही.
एका खात्यातून
दुसऱ्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यासाठी तीन पद्धती प्रचलित आहेत. NEFT, RTGS आणि IMPS. तीनही पद्धती सर्व प्रकारच्या
ग्राहकांसाठी खुल्या आहेत. पण,
तिघांचे नियम आणि उपयोग आणि
सेवांसाठी लागणारे दर वेगवेगळे आहेत.
क्रेडिट आणि डेबिट कार्डचे नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आधी त्यांचे अर्थ
समजून घेऊया...
NEFT म्हणजे काय?
शब्दश: NEFT म्हणजे नॅशनल
इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. देशांतर्गत आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन पैसे
हस्तांतरित करण्याची सोय. रिझर्व्ह बँकेनं 2005 पासून भारतीय ग्राहकांना उपलब्ध
करुन दिली आहे. तुमचं बँक खातं नसेल तर तुम्ही जवळच्या एखाद्या बँकेच्या शाखेत
जाऊन तिथं रोखीने पैसे भरु शकता आणि ते पैसे मग तुम्ही सांगितलेल्या खात्यात
ऑनलाईन जमा होतील, अर्थात NEFT च्या माध्यमातून...(तुम्ही खातेधारक नसलात तर अशा व्यवहारांसाठी 50 हजार रुपयांची
मर्यादा आहे)
बँकेच्या
दृष्टीने विचार केला तर दर अर्ध्या तासाला अशा ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यवहारांचा
उपसा संबंधित बँक एकत्रपणे करत होती. म्हणजे आपण 8 वाजता पैसे हस्तांतरित करण्यासाठी
नोंदणी केली असेल तर पुढच्या सेटलमेंटच्या वेळेला तुमच्या अर्जाची दखल घेतली
जाणार. आतापर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध होती. पण, आता ही सेवा 24 तास सुरू करण्यात
आली आहे.
हे पैसे त्याच
दिवशी इच्छित बँक खात्यात जमा होतात. आजपासून NEFTचे व्यवहार २४ तास चालू राहतील असे
रेसेर्वे बँक ऑफ इंडिया यांनी सांगितले आहे. रिझर्व्ह
बँकेच्या नवीन निर्णयानुसार आता 2020
पासून ही सेवा पूर्णपणे मोफत झाली
आहे.
र
लोकांना ऑनलाईन
किंवा डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून रिझर्व्ह बँकेनं NEFT सेवा मोफत आणि 12 महिने 24 तास सुरु
ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
RTGS म्हणजे काय?
RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट -
हे व्यवहार नावाप्रमाणेच नोंदणी झाल्याझाल्या क्षणी पार पडतात. आणि सांगितलेल्या
पूर्ण रकमेचा व्यवहार होतो. पण,
हे व्यवहार मोठ्या रकमेचे असतात.
दोन लाखांपेक्षा
जास्त पैसे हस्तांतरित करायचे असतील तर या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येतो.
त्यामुळे अनेकदा असे व्यवहार उद्योगधंद्यासाठी होतात.
3) IMPS (Immediate Payment Service) : यात एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक
खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा
वापर करता येतो. NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर
दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या 24 तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही
करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन National Payment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते. भारतामध्ये 22 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिकरीत्या ही सेवा सुरु
करण्यात आली.
IMPS म्हणजे काय?
IMPS म्हणजे अलीकडेच सुरू झालेली पैसे
हस्तांतरणाची अद्ययावत पद्धत आहे. इमिजिएट पेमेंट सर्व्हिस म्हणजे तात्काळ पैशाची
देवाणघेवाण करणारी ही व्यवस्था आहे.
ही सेवा 24 तास सुरू असते, अगदी सुटीच्या
दिवशीही. ऑनलाईन बँकिंग, रिझर्व्ह बँकेनं निर्देशित केलेल्या निवडक प्री-पेड माध्यामाद्वारे
किंवा एटीएम केंद्रांवर जाऊन तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.
,NURPHOT
मोबाईल, इंटरनेट किंवा
एटीएममधून तुम्ही व्यवहार पार पाडू शकता. ही सेवा सुरक्षित आणि भरवशाची मानली
जाते. शिवाय पैशाचा व्यवहार पूर्ण झाला तर तुम्हा बँकेकडून तसा एसएमएसही येतो.
अलीकडच्या तरुण पिढीमध्ये IMPS विशेष लोकप्रिय आहे. या सेवेसाठी रुपये 5 ते 25 पर्यंत खर्च येतो.
किती पैसे हस्तांतरित करायचे आहेत त्यावरुन साधारणत: हा दर ठरतो.
यातील कुठली सेवा निवडायची?
RTGS सेवा 2 लाखांवरील
रकमेच्या व्यवहारांसाठी असल्याने त्याचा उपयोग आपल्याला नेहमीसाठी होणार नाही. पण, NEFT आणि IMPS या सेवांमधील
कुठली सेवा निवडायची असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार.
खासकरून NEFT सेवा आता निशुल्क
आणि 24/7 तासांसाठी उपलब्ध झाल्यावर हा प्रश्न नक्कीच पडला असणार.
स्रोत,PUNIT PARANJPE
NEFT, IMPS व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचा अंकुश असतो
'दोन्ही सेवांचा तुलनात्मक अभ्यास
केला असता, IMPS सेवेअंतर्गत दोन लाखांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित करता येते. तर
अशी कुठलीही मर्यादा NEFT वर नाही. घराचे
खरेदी-विक्री व्यवहार किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणं त्यामुळे सोपं होईल. आणि या
व्यवहारांची नोंदणीही सोपी होईल.
'व्यवहार जितके ऑनलाईन होतील, तेवढी काळ्या
बाजाराची शक्यताही कमी होणार आहे. आणि अशा सेवांसाठी मनुष्यबळ कमी लागून त्या
स्वस्त होणार आहेत, त्यासाठी सरकारचा डिजिटल व्यवहारांसाठी आग्रह आहे.
रिझर्व्ह बँकेनं NEFT सेवा निशुल्क
करताना एक पत्रक काढलं आहे. आणि त्यातही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यावर
ठाम असल्याचं म्हटलंय.
NEFTचे व्यवहार नि:शुल्क झाले. IMPS सेवेसाठी अजूनही
शुल्क आकारलं जातं. हे शुल्क रुपये पाच ते 25 पर्यंत आहे. त्यानुसार कुठली सेवा
निवडायची याचा निर्णय ग्राहकांना घेता येईल.
ATM केंद्रांवरूनही NEFTचे व्यवहार करता येतात
NEFT सेवेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला
लाभार्थी खातेदारांबद्दलची माहिती ऑनलाईन का होईना, नोंदणीकृत करावी लागते. 'NEFT च्या नोंदणीसाठी खातेदाराचा खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड अशी माहिती
ऑनलाईन अर्जात द्यावी लागते,
त्याची पडताळणी झाल्यावर तुमचा अर्ज
स्वीकारला जातो.
आणि मग व्यवहार
पूर्ण होतो.
दुसरीकडे IMPS सेवा मोबाईलवर
अॅपच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी बनवली आहे. IMPS च्या नोंदणीसाठी मोबाईल मनी आयडेंटिफायर क्रमांक लागतो. (हा सात
आकडी क्रमांक बँक नोंदणी करताना देते ) त्यानंतर लगेचच तुम्ही पैसे हस्तांतरित करू
शकता.'
या कारणामुळेच IMPS सुटसुटीत आणि
तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
पण, NEFT आणि IMPS सेवांची काही खास
वैशिष्ट्यं आहेत. आणि गरजेनुसार यातला कुठला पर्याय निवडायचा हे ग्राहकांनी
ठरवायचं आहे.
NEFT आणि
शुल्क :
i) 1
लाखांपर्यंत : 5 रुपये + सेवा कर
ii) 1
लाखांपेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमी : 15
रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर
iii) 2 लाखांपेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी : 25
रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर
👉 RTGS आणि शुल्क :
i) 2
लाख ते 5 लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी :
प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 30
रुपये.
ii) 5
लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 55 रुपये.
👉 RTGS व NEFT प्रणाली मार्फत रक्कम पाठवण्यासाठी
आवश्यक गोष्टी :
i) पाठवायची
रक्कम.
ii) इतर
बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचा खाते क्रमांक.
iii) लाभार्थी
बँकेचे नाव.
iv) इतर
बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचे नाव.
v) रक्कम
पाठवणा-या काढून स्वीकारणा-या साठी काही संदेश असेल तर.
vi) IFSC Code (आयएफएससी कोड - RBI द्वारे
सर्व बँकांना व त्यांचा शाखांना ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोड नियुक्त केलेला
असतो)
vii) रक्कम
पाठवणा-याचा मोबाईल क्रमांक.
0 टिप्पण्या